त्वत्प्रीतीस अपात्र हा जन तुला कालान्तरीं वाटला,
तोडावा तुजला मदीय जर हा संबन्ध गे लागला,
माझी हस्तक जोडुनी तर तुला विज्ञापना ही असे
( ती तूं मान्य करीं म्हणूनि तुज मी हा दास याचीतसें) :- १
बोटें मोडुं नको, तसे मजवरी डोळे वटारुं नको,
आंठ्या घालुं नको, प्रसन्नमुखता देऊं चळूं ती नको,
मातें ती अवधीरणा, जिवलगे, दावावया लौकरी,
पायानें झिडकारणें न बरवें मातें गमे सुन्दरी ! २
कां की, तूं प्रणयें बिघाड लटिका जेव्हां मशीं दाविसी,
त्या वेळीं असले प्रकार बहुधा तूं लाडके ! योजिसी;
यालागूनि जंधीं प्रकार तसले पाहीन तूझेवरी,
तेव्हां ते मज भासतील अवघे सव्याज, साचे जरी. ३
कण्ठीं घालुनि हात, चुम्बन हळू माझें गडे ! तूं करीं,
मेरी जान् ! गुलगार ! सांग निघुनी जायास मातें दुरी !
तेणें त्रास तुला मुळीं न पडणें होईल माझे करें,
कां कीं तें तव सांगणें मज गडे वाटेल तेव्हां खऱें ! ४
कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
मुंबई, १५ डिसेंबर १८९०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा