जरी तूं ह्या येथें असतिस सखे सौख्यद मला,
तुझ्या तेथें वा मी जरिहि असतों लोलुप तुला,
तरी खासें झालें कितिक मजला सांग असतें? –
दुरावूं, अन्योंन्यां कवळुनि, दिलें आम्हिं नसतें. १
त्वरेनें त्या क्रिडा मग उजळित्या या रजनितें,
-सरेना जी खेपा करित असतां मी इथतिथें,
- तुला वा मच्चित्रें क्षण दिसवुनी लाजवुनियां,
पुन्हां तीं झांकोनी, छल तव करी जी समयिं या. २
‘प्रिये’ ‘कान्ते’ हीं मी मधुर अभिधानें मग किती
श्रुतिद्वारें चित्तीं तव दवडिलीं जाण असतीं !
न वा ऐसें. – तीं मी लिहुनि निजदन्तीं त्वदधरीं,
तुवां तीं वाचाया मुकुर धरितों मी तव करीं ! ३
‘प्रिये’ ‘कान्ते’ ऐशा मधुर अभिधानांस अधुना
लिहावें मीं पत्रावर लकडिनें या अहह! ना?
परी तींही आतां अतितर सुटोनी थरथर
पुरीं हाताच्यानें नच करवती गे हरहर ! ४
पुरीं हाताच्यानें नच करवतीं तीं प्रिय जरी,
न वा डोळ्यांच्यानीं क्षण बघवतीं तेंवि अपुरी;
पुसाया तीं इच्छीं परि कर धजेना म्हणुनियां
कराया सांगें तें स्वनयनजलांला रडुनियां ! ५
कवी - केशवसुत
वृत्त – शिखरिणी
१८८६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा