(याचे मूळ The Death Bed हे काव्य Thomas Hood याने आपल्या एका बहिणीच्या मरणसमयी लिहिले.)
आम्ही तीचें श्वसन रात्रभर सचिंत हो निरखियलें,
श्वसन तिचें मृदु मन्द जें अमुच्या कानीं पडलें – १
अम्हां त्यामुळे, तीचे वक्षीं आयुष्याची लाट
हेलकावते खालवर, असें समजायाला वाट. २
तेव्हां आम्ही कितीतरी पण हलक्यानें बोलावें,
सावकाशही तसें भोंवती फिरतांना चालावें ! ३
जाणों तीचें लांबवावया आयुष्य अम्हीं आपुल्या
अर्ध्या किम्बहुना सगळ्याही शक्ति तिला अर्पियल्या. ४
अमुच्या आशांनी भीतीला खोटसाळ हो म्हटलें,
तसें आमच्या भीतींनींही आशांला ठरवियलें ! ५
आम्हांला ती भासे मेली जेव्हां ती निजलेली,
आणि अहह ! निजलेली जेव्हां हाय! हाय! ती मेली. ६
कारण, नंतर पहाट आली अंधुक उदास तैशी
आणि हिमाच्या वर्षावाने काकडलेली ऐशी, ७
शिव ! शिव ! तेव्हां स्तब्धें पक्ष्में तिचीं सर्वथा मिटलीं,
- तिची आमुचीहुनी निराळिच पहाट तेव्हां झाली! ८
कवी - केशवसुत
जाति – साकी
मार्च किंवा एप्रिल १८८६

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा