घेउनि ह्रदयाशीं सुतेला, स्थित मी दाराशीं
म्हातारी आली तरंगत, मुलगीला दिसली;
हात पुढें केले धराया तिला तिनें अपुले;
तिच्या शिरावरुनी तधीं ती गिरक्या घे उडुनी;
हंसत वरी करुनी हात, ती धरुं झटे फिरुनी;
त्या चलनें वरती उडाली म्हातारी परती;
खिवळत तें बघतां उडाया पाही मम दुहिता !
दडपण संसूतिचें निधालें मम चित्तावरचें;
मन्मनही लागे तरंगूं म्हातारीसंगें !
वारा तों तिजला लागला दूरच न्यायाल.
चुम्बुनि वत्सेला वदें मी मग म्हातारीला ---
“ थांब, थांब ! जाशी अशी कां ? फिर ये गे मजशीं;
वयस्कता माझी म्हणुनि जर करिसी इतराजी,
तर माझी सोनी पाहुनी ये गे परतोनी !
तुजला पाहूं दे तियेला, खिदळत राहूं दे !
मज वय विसरूं दे, मुग्ध--मधु--बाल्यीं उतरूं दे !
ते दिन पुष्पांचे, कोवळया किरणीं खेळाचे !
हे दित--हया !---
हे दिन चिन्तांचे परंतु लटिकें हंसण्याचे !
हे दिन ......... जाऊं चे ! मला तुज गाणें गाऊं दे.
“ म्हणती म्हातारीं तुज, कधीं होतिस तरुण परी ?
तव जनि मूति न दिसे, अजामर रूप तुझें भासे !
कोठुनि तूं येशी, न वदवे, कोठें तूं जाशी;
स्वैरपणें भ्रमसी, यदृच्छा मूर्तच तूं गमनी !
“ येशी तूं का गे यक्षिणीकुंजांतुनि ?-- सांगे
कैशा वागुनियां मिळवितो अक्षय यौवन त्या ?
झिजवित नित्य जिणें तयांला पडतें का मरणें ?
वद त्यांची रीती ध्यावया आम्ही लागूं ती.
या गन्धर्वाचें विमानच सूक्ष्मरूप साचें
वद असशी का तूं तरंगत वातावरणांतून ?
सूक्ष्म देह धरुनी असति का तुजवरि ते बसुनी ?
दिव्य असें गाणें गात तें असतिल सौख्यानें,
तें मज पाप्याला कशाचे ये ऐकायाला !
परि मम वत्सेतें गमे तें परिसाया मिळतें;
म्हणूनिच उल्हासें अशी ही वेडावूनि हांसे !
“ अज्ञातामधला मूर्त तूं गमसी ध्वनि मजला
अर्थ तुझा कोण मला तो देइल सांगोन ?
कळेल जर मज तो, तर जगीं भरला जो दिसतो ---
मी तो अंधार लोपवूं झटेन साचार !
“ खपुष्प तूं असशी काय गे--सांगुनि दे मजसी.
तुझे रंग वास न कळति मर्त्य मनवास;
जर ते कळतील तर इथें स्वर्गच होईल !
मग तुज धरण्यातें मुलांपरि मोठे झटतिल ते !
“ स्वरूप सत्य तुझें मुळींही तें मजला नुमजे;
तरी तुझ्या ठायीं वसतसे अद्भुत तें कांहीं;
प्रत्यक्षांतुनि तें परोक्षीं शीघ्र मला नेतें;
तेथें स्वच्छंदें विचरतां मोद मनीं कोंदे;
मग गणमात्रांतें जोडणें केशवपुत्रातें,”
कवी - केशवसुत
कवितासंग्रह - हरपलें श्रेय
२५ जानेवारी १९०१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा