एकदा काही कवी मंडळींबरोबर गडकरी सिंहगड पाहायला गेले. तेथे डोणागिरीच्या कड्यावर उभे असताना पुष्कळशा कवींना काव्य रचण्याची स्फूर्ती आली आणि जो तो ‘उद्धवा शांतवन कर जा’ या चालीवर ऐतिहासिक कविता लिहू लागला. गडकरी शांतपणे उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यांना विचारले की‚ ‘‘काय हो गडकरी‚ डोणागिरीचा कडा पाहून तुम्हाला एखादी कल्पना कशी सुचत नाही?’’ त्यावर गडकरी म्हणाले‚ ‘‘हा कडा बघून एक उत्तम कविकल्पना या क्षणी माझ्या मनात आली आहे की‚ साऱ्या कवींना एका पोत्यात घालून खाली ढकलून देण्यासाठी डोणागिरीसारखा दुसरा सोईस्कर कडा नसेल या महाराष्ट्रात!’’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा