राज्यकर्त्यांना अंदाजपत्रकाची जुळवणी करताना कर लादण्यासाठी नवी नवी क्षेत्रे शोधावी लागतात. विवाहित जोडपी ही विविध खर्चाखाली भरडली गेलेली असतात. ‘एकटा जीव सदाशिव’ अशा ब्रह्मचाऱ्यांना त्या मानाने खर्च कमी असतो. हा विचार जर्मनीमध्ये केलेला आढळतो. महायुद्धाच्या काळात नव्या कराच्या यादीत ‘ब्रह्मचाऱ्यावर कर’ लादण्याची कल्पना पुढे आली.
त्याबाबत खुलासा मागताना हिटलरने विचारले‚ ‘जनतेला हा कर झेपेल का?’
त्यावर एका अविवाहित नागरिकाने विनंती केली‚
‘तंगीच्या काळात कच्च्या मालावर जकात बसवू नये.’
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा