रक्तपिपासू बाई

रक्तपेढीचं मोठ्या प्रमाणावर कार्य करणाऱ्या लीलाताई मुळगावकर या सुप्रसिद्ध आहेत. एका रक्तदान कार्यक्रमात पु.लं.नी रक्तदान केले. तेव्हा विनाक्लेश रक्त घेण्याची नवी उपकरणे उपलब्ध असल्याचं लीलाताईंनी पु.लं.ना सांगितलं. पु.लं.नी ताबडतोब त्या उपकरण खरेदीसाठी चाळीस हजार रुपयांची देणगी दिली. फक्त एका अटीवर. ती अट म्हणजे कोठेही पु.लं.चं नाव न देण्याची!


पु.लं.ना या गोष्टीची प्रसिद्धी नको होती. तरीही लीलाताईंनी एक छोटा कार्यक्रम केलाच. विजय मर्चंट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तेव्हा पु.लं.नी विनोदी शैलीत छोटेखानी भाषण केलं. माझ्या हातात रक्त काढण्याची सुई खूपसल्यावर लीलाताईंनी उपकरणासाठी देणगी देण्याचा विषय काढल्याने मला हो म्हणावेच लागले असं पु.ल. म्हणाले.


लीलाताईंच्या सातत्याने रक्तपेढीच्या चाललेल्या कार्याचा गौरव करून ते म्हणाले,

‘‘इतकी रक्तपिपासू बाई मी जन्मात पाहिली नाही!’’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा