तोटा वाटून घ्या!

प्रा. श्रीराम पुजारी आणि पु.ल. खास दोस्त.

पुण्यात एकदा पु.ल., राम पुजारी बादशाही बोर्डिंगमध्ये चहा पीत बसलेले. तेवढ्यात अरविंद गोखले तिथे आले. गप्पा रंगत आल्या. अरविंद गोखले म्हणाले, हे प्रकाशक आपल्याला लुटतात. आपल्याला फारसे पैसे देत नाहीत. तेव्हा आपणच आपली पुस्तके प्रकाशित करूया. आपण ती प्रकाशकांना द्यायचीच नाही.

त्यावर पुल. अगदी गंभीरपणाचा आव आणून म्हणाले −
‘‘ही कल्पना फारच चांगली आहे. फक्त वर्षअखेरीला येणारा तोटा आपण सार्यांनी वाटून घ्यायचा म्हणजे झालं.’’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा