टिळक स्मारक आणि पु.ल.


बालगंधर्व रंगमंदिराच्या आखणीमध्ये पु.ल.देशपांडे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. एक चांगलं नाट्यगृह उभं राहिल्याचं समाधान सार्यांना होतं. टिळक स्मारक मंदिरही नवीन बांधलं जात होतं. तेव्हा काही लोकांच्या विनंतीवरून पु.लं.ना टिळक स्मारक मंदिर दाखवायला आणलं. काम तर पूर्ण झालं होतं. त्यामुळे पु.लं.नी फारशा सूचना दिल्या नाहीत. वास्तू पाहता पाहता ते रंगमंचावर आले. कडेचा भागही पाहिला. तिथे कलाकारांसाठी जवळ असं प्रसाधनगृह (टॉयलेट) नव्हते. तेव्हा पु.लं.नी ही सोय करावी अशी सूचना व्यवस्थापक मंडळांना केली. त्यांनीही ती मान्य केली. पु.ल. मित्राजवळ गप्पा मारताना म्हणाले − ‘‘टिळक स्मारक मंदीराबाबत बोलायचं झालं, तर मराठी रंगभूमीला माझं काय योगदान तर फक्त प्रसाधनगृह!’’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा