एके दिवशी वेदनांनी बेजार झालेला बंड्या डॉक्टरांच्याकडे कसाबसा गेला ....


बंड्या  : डॉक्टर.... साहेब.. ..आह ..पोटात ...... अग आई ग...खूप... दुखतय...आह ....

डॉ : अच्छा !! हे सांग शेवटचे जेवण कधी आणी काय जेवला होतास..?

बंड्या  : जेवण नेहेमीचेच हो.. रोजच्या सारखे ....

डॉ : अच्छा अच्छा!! (२ बोटांची खूण करत ) इकडे शेवटचं कधी गेला होतास ...?

बंड्या : रोजच प्रयत्न करतो पण....पण.... होतच असे नाही... गेले तीन दिवस......


डॉ समजले याला ... constipation आहे...


डॉक्टर आत गेले आतून एक औषधाची बाटली ...आणि सोबत एक कँल्क्युलेटर  पण घेऊन आले ...


बंड्याला विचारले - घर किती दूर आहे तुझे ?

बंड्या  : 1 km

डॉक्टरांनी कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व चार चमचे औषध काढून एका वाटीत ओतलं.

डॉ : वाहनाने आलास की चालत ?

बंड्या  : चालत ..

डॉ : हं... जाताना धावत जा...


डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : घर कितव्या मजल्यावर आहे ?

बंड्या : तिसऱ्या मजल्यावर.

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : लिफ्ट आहे की जिना चढून जाणार ?

बंड्या  : जिन्याने ...

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले.....

डॉ : आता शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दे...

घराच्या मुख्य दरवाज्यापासून टॉयलेट किती दूर आहे ?

बंड्या : जवळजवळ २० फुट..

डॉक्टरांनी परत कँल्क्युलेटरवर काही आकडेमोड केली व वाटीतील थोडे औषध काढून घेतले........

व म्हणाले

आता माझी फी आधी दे..मग औषधाचा हा डोस घे...मग कुठेही न थांबता फटाफट घर गाठ...नंतर मला फोन कर....!

बंड्या ने तसंच केलं.......

अर्ध्या तासाने डॉक्टरांना बंड्याचा फोन आला ...

एकदम बारीक थकलेल्याआवाजात.........

डॉक्टर साहेब औषध तर उत्तम, जालिम होत हो तुमचं. पण तो कँल्क्युलेटर ठीक करुन घ्या हो...

.

.

.

फक्त 10 फुटांनी हारलो ना मी......
*दोन बायकांचा ऑफिस मधील संवाद :*

पहिली : अगं, माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली, तुझी कशी गेली?

दुसरी : एकदम नकोशी. काल माझा नवरा घरी आला 3 मिनिटात जेवला आणि दोन मिनिटात झोपला. तुझं?
पहिली : एकदम मजेत. माझा नवरा घरी आला आणि मस्त जेवायला बाहेर घेऊन गेला. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत तासभर चालत घरी आलो. घरी आल्यावर त्याने घरभर पणत्या लावल्या. खरोखर एखाद्या परिकथेसारखंच वाटलं मला.

*त्याचवेळी कामावर नवर्यांचा संवाद*

पहिला : कशी गेली कालची संध्याकाळ?
दुसरा: उत्तम. घरी आलो जेवण तयारच होतं, मी जेवलो आणि पटकन झोपलो. तुझं?

पहिला : अरे एकदम भयानक. घरी आलो, जेवण तयार नव्हते, वीजबिल न भरल्यामुळे घरात वीज नव्हती; म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतके महाग होते की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही. मग पायीच घरी चालत आलो, घरी वीज नसल्याने घरभर पणत्या लावल्या.

**तात्पर्य *: तुम्ही जगाला कसं भासवता हे महत्वाचे.... मग वस्तुस्थिती काही का असेना? .....*

*चाणक्य म्हणतो,*
*जर तुम्हाला नवऱ्याबरोबर आनंदात राहायचे असेल तर त्याच्यावर प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला पूर्ण समजून घ्या.*
*आणि*
*जर तुम्हाला बायकोबरोबर आनंदात राहायचे असेल तर तिच्यावर मनापासून भरपूर प्रेम करा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करू नका.*

*सर्व विवाहित दाम्पत्यांना समर्पित**
निळू फुले बस स्टॉप वर उभ्या असलेल्या बाईला
डोळा मारतात  .

बाई : अहो. .
मि तसली बाई नाही आहे.

निळू फुले : बाई ऽ ऽ ऽ
ते ठिक आहे पण
चेक करणे आमचं काम आहे.
शिक्षक: चालढकल ह्याचा अर्थ सांग
बंड्या: सर,उद्या सांगितला तर चालेल??
सर्वात कमी दिवस काम करून वर्षभरचे पैसे कमावण्याचे कर्तुत्व भारतात फक्त दोनच गोष्टींकडे आहे:




फाल्गुनी पाठक
आणि
मोती साबण ...
मुलगी : 'देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे. मला हवं असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे. मी जगातल्या सगळ्या गोष्टीत यशस्वी होऊ शकते.

पण, माझे आई-बाबा म्हणताहेत की लग्न कर. देवा मला नवरा नकोय.'

देव : 'मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस. यापुढेही तुला यश मिळतच राहील.

पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते.

अशा वेळी तू कोणाला दोष देशील? कुणावर खापर फोडशील?'
*...त्यासाठी तुला 'नवरा' असलाच पाहिजे.*
😜😜😀😀😀😂😂😂

🎉 मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉

🙏🏻 कुसुमाग्रजांना वंदन करुन संत तुकारामांच्या चरणी केलेली ही आगरी विनवणी 🙏🏻

तुका तुला परत
वैखुंटानशी यवाला लागल...
गीता नाय त कविता तरी
परत ऐकवाला लागंल...

मायबोलीला नाय राला
आया कयाच र स्थान
मराठीचा पुन झेत चाल्यान
आपलीच लोखा प्रान
अमृताशी पैजा जिकाला
तुला पुष्पक इमान काराला लागंल....

तुका तुला परत यवाला लागल...

बायेरचे देशान तुझं अभंग
बेस्ट सेलर मनुन इकतान
सांग पन आपले घरान
कवरी जना वाचतान
अाता खारीन नय बावरीन तरी
तूझं अभंग तराला पायजे

तुका तुला परत येवाला लागल...

आपलेच भाषेला बोलताव आपण
गावरान ना गावठी
सांग कशी टिकल म
आपली र मराठी
धवलारीनला पुन हालदीन आता
इंग्लीश धवला गावला लागंल....

तुका तुला परत येवाला लागल...