अंधार असा घनभारी
चंद्रांतुन चंद्र बुडाले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणुं दुःख घराला आलें.
स्मरणाचा उत्सव जागुन
जणुं दुःख घराला आलें.
दाराशीं मी बसलेला
दुःखावर डोळे पसरुन
क्षितिज जसें धरणीला
श्वासांनी धरतें उचलुन...
क्षितिज जसें धरणीला
श्वासांनी धरतें उचलुन...
विश्रब्ध किनारे दूर
जाऊन कुठे मिळताती
जणुं हृदयामागुन माझ्या
झाडांची पाने गळती....
नाहींच कुणी अपुलें रे
प्राणांवर नभ धरणारें
दिक्काल धुक्याच्या वेळीं
हृदयाला स्पंदविणारें....
दिक्काल धुक्याच्या वेळीं
हृदयाला स्पंदविणारें....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा