पार्श्वभूमि

 भुरभुरत्या संधिप्रकाशांत भिजलेलें
कार्तिकांतील धुकें
डोळ्यांच्या बाहुल्यांना चिकटलेले
मायेचे क्षण.
सरकणाऱ्या क्षितिजावर ओळख
हरवून बसलेली छायावेळ.
अथांगपणांत बुडालेलें माझें 
स्वप्नगंध.
एक हलकासा तरंग घेऊन मीहि
ढवळून काढावा आसमंत.... 
हीं शिखरें मोडावीत....
हीं झाडें सारावींत....
– हा पूल जोडावा....
आणि नसलेल्या सुरूंच्या झाडांना
द्यावी एखाद्या प्राचीन शिल्पाची 
पार्श्वभूमि.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा