माहेर

 चांफ्याच्या झाडापाशीं

अंधार जसा गांधार निनादत येतो. माहेर निळें कोणाचें....

चोळींत दुधाचा थेंब जसा तळमळतो.

माहेर तुला नसतांना

ओटींत तुझ्या मी कसा भरावा वारा

दुःखाचा जन्म घरा ये

आभाळ सोडतां घुंगुर बनतो तारा....

वैराण दिशांचा जोग

चांदणें नदीच्या पाण्यावर निजलेलें

तव हात उडोनी जाती

जे ओल फुटाया तूंच स्तनांवर धरले....

शिल्पान्त खंड स्मरणाचा

निःसंग जोडिशी क्षितिज कशाला भगवें हें जरी मिटे प्राणानें

सान्तांतुन अवघें अस्त घेऊनी उगवे ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा