कुणी आपुलें म्हणेना
कुणी बिलगेना गळां
कंठ दाटतांना झाला
रंग कावळ्यांचा काळा.
कुणी बिलगेना गळां
कंठ दाटतांना झाला
रंग कावळ्यांचा काळा.
नसानसांतून वाहे
फणा उगारून साप.
दूर सावल्यांचा घोळ
माझें नाचवितो पाप.
रात्र आंधळ्या कौलांची
कुणी आढ्याला बांधली
चंद्र पडला मरून
चंद्र पडला मरून
इथें पहाडाच्या खालीं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा